• Profile picture of Tushar Rajendra Surte

    Tushar Rajendra Surte posted an update 8 years, 2 months ago

    मनात सलणारी एक गोष्ट नेहमी मी आपल्या आजूबाजूला बघत होता . रोज उगवणारा दिवस त्याच्या बरोबर काहीतरी नवीन खबर बातमी घेवून येईल. काहीतरी आपल्या आयुष्यात नवीन करण्याच्या विचारात रोज घरातुन बाहेर निघायचे व रस्त्यानं चालत असतांना जे दृश्य समोर दिसायचे ते बघून पुनः एक जिवंत सत्य समोर उभे असायचे ते सत्य म्हणजे काय खरच माझ्यातली माणूस कि संपली आहे का ?का माझ्यातला माणूस मेला आहे का ? का मी एवढा भावना शुन्य झालो आहे का? का मला माझ्या स्वार्था पेक्षा काही काही ही दिसत नाही का? का बर माझ्यातली सद्सद विवेक बुद्धी काम करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात त्या एका प्रसंगाने उभे केलेत व मला स्वतःचा शोध घेण्यासाठी भाग पाडले..कारण होते माझे व्होट्सप वरील फोटो व विडीयो बघून माझ्या काही मित्रांनी मला त्यांच्या एका ग्रुपला अॅड केले होते.त्यांच्यातला एक ड्रायवर होता तो खुठे तरी गाडी घेवून फिरायला गेला होता,तर रस्त्यात एका गाडीचा एक्सेडेंट झाला होता.आणि ह्या भावाने त्या संपूर्ण घटना कर्माचा विडीयो व फोटा याने चक्क शेअर केले होते,तो फोटो आणि विडीयो पाहून हृद्य अक्षरशा पिळवटून गेले,एका १२ -१३ वर्षांच्या देहाचे दोन भाग झाले होते.तिची आई आपल्या मुलीचे शरीर हातात घेऊन त्या शीर नसलेल्या.धडाला कवटाळून बसली होती तिचा विश्वासच बसत नव्हता की तिची मुलगी ह्या जगात राहिली नाही.व दुसऱ्या बाजूला त्यामुलीचे वडील त्या मुलीचे शीर हातात घेऊन ओक्साबोक्शी रडत होते.हा सर्व प्रकार पाहून मला अंतकरणा पासून एवढा त्रास झाला की माझे डोळे माझ्या न माहिती पाणावले,त्या गाडीतला एक माणूस घायाळ असून हि गाडीतल्या बाकीच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता व स्वतला सुज्ञ समजणारा माणूस हा त्या वेळा एका बघ्याची भूमिका घेऊन फक्त फेसबुक व व्होट्सप वर शेअर करून जास्तीत जास्त लाईक मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी झाला होता.का तिथे उभे असलेल्या माणसांना माणुसकीचा विसर पडला?का सर्व माणुसकी विसरून त्या दुखीतांच्या दुखाचा बाजार मांडून बसले ?काय साध्य करयचे होते ह्या प्रकाचे फोटो व विडीयो शेअर करून की आमच्यातली माणुसकी हि भावना शून्य झाली आहे.का?आम्ही सर्व हे ह्या डोळ्यांनी बघितले आम्ही ह्या सर्व घटनेचे साक्षीदार आहोत.हे दाखवाचे होते का?असे एक नं अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले वह्या सर्व गोष्टीचा फार संतापही झाला व मी त्या ड्रायवर मित्रला फोन केला व विचारले.की तू हि पोस्ट का शेअर केली तर त्याने उत्तर दिले की.मला त्या वेळेला काहीच सुचले नाही काही लोक फोटो व विडीयो काढत होते मला वाटले की मी हि काढुन ते शेअर करावे.त्या वेळी मी त्याला फार बोलणार होतो पण जेव्हा त्याचे हे उत्तर एकले तेव्हा मनात विचार केला व त्याला मग एक प्रश्न विचारला की जर ती घटना जर तुझ्या गाडीच्या बाबतीत घडली असती व तुझ्या समोर लोकांनी तुला मदत करयचे टाळून जर असे फोटो व विडीयो काढले असते तर तुला काय वाटले असते .त्या तो काहीच बोलू शकला नाही मग मी त्याला सांगितले की तू थोडी त्या आईवडिलांच्या दुःखाची थोडी जाणीव तर ठेवायला पाहिजे होती जर तू ह्या सर्व गोष्टींचा विचार कर व जर पुनः अशी काही घटना जर दिसली तर फोटो काढण्या पेक्षा त्या अपघात ग्रस्त लोकांना मदत कर.हे बोलणे सर्व त्याला लक्षात आले व त्याने ग्रुप वरून त्या सर्व पोस्ट डीलेट केल्या व माझ्या बरोबर सर्वांना हा संदेश हि दिला की पुनः कोणाच्या भावनांशी निगडीत अश्या पोस्ट शेअर करू नका उलट अश्या संकटाच्या वेळी संकट ग्रस्तांची मदत करा.
    (क्रमशः)